GST Bhide Consultants
15.08/2022
सप्रेम नमस्कार विनंती विशेष
महाराष्ट्र टाएम्स रोमवार ८ ऑगस्ट २०२२ ला हा लेख प्रकाशित झालेला आहे तो आपणासाठी पाठवीत आहे.-
जी एस् टी मधील निवासी जागा भाड्याने देण्यासंबंधी
वस्तु सेवा करा या विषयात नुकतेच काही बदल झाले असून ते १८
जुलै २०२२ पासून लागू झाले आहेत त्यापैकी एक महत्त्वाचा बदल असा की निवासी जागा व्यावसायिकास
भाड्याने दिली तर त्यावर कर लागणार आहे.
या संबंधी थोडी पार्श्वभूमी जाणणे महत्त्वाचे आहे. जागा भाड्याने
देणे ही पूर्वापार करपात्र सेवा मानली गेली असून जी एस् टी आल्यादिवसापासूनच ती करपात्र
आहे. या संबंधी अधिसूचना १२/२०१७मधे असा खुलासा करण्यात आला आहे की सदर जागा निवासी
कारणासाठी भाड्याने दिल्यास त्यावर कर आकारणी होणार नाही किंवा त्यावर करमफी आहे. या
चा अर्थ असा की सामान्य माणसांना निवासासाठी जागा भाड्याने घेतली तर त्यावर सरकार कर
आकारणार नाही.
१८ जुलै २०२२ पासूनही यात काहीच बदल करण्यात आला नाही. पूर्वापार
अनेक व्यावसायिक आपापला व्यवसाय निवासी जागेतून करीत आले आहेत, अनेक चार्टर्ड अकाउंटंट्स,
सल्लागार व अन्य व्यावसायिक घरे, सदनिका यांचा वापर आपले कार्यालय, दुकान, गोडाऊन म्हणून
करीत आले आहेत. एक तर मोठी दुकानी, ऑफिसे वगैरेंची यांना आवश्यकता नसते तसेव व्यावसायिक
जागांपेक्षा निवासी जागा कमी भाड्यात मिळतात.
१ जुलै २०१७ म्हणजे या कराच्या पहिल्या दिवसापासून सदर जागा
अन्य कारणासाठी (निवासी व्यतिरिक्त) भाड्याने दिल्यास त्यावर कर आकारणी होत असते मात्र
त्याकरता सदर मालकाची उलाढाल वर्षाला वीस लाखांहून अधिक असल्यासच त्या व्यवहारावर कर
आकारणे अनिवार्य आहे मात्र अनेकदा फ्लॅट मालकाची उआढाल या रक्कमेच्या आत असल्याने कोणी
कर आकारत किंवा भरताना आढळत नाही व एक प्रकारे कराची गलती होते.
ही गळती त्यांबविण्याचा एक भाग म्हणून सरकारने एक बदल सुचविला
आहे. त्यानुसार नोंदणीझालेल्या व्यावसायिक, व्यापारी यांनी निवासी जागा भाड्याने घेतली
तर त्यांना त्यावर कर भरावा लागणार असूअ तो ही उलट्या पद्धतीने म्हणजे रिर्व्हर्स चार्ज
मेकॅनिझम प्रमाणे. म्हणजेच व्यावसायिकाने भाड्याची रक्कम सरकारला द्यायची आणि कराची
रक्कम सरकारला भरायची. याचा परिणामज्या व्यावसायिकांनी (जी एस् टी खाली) नोंदणी केली आहे असे सर्व व्यावसायिक
जे आपालली दुकाने, कार्यालये, व्यवसाय एखाद्या
सदनिकेतून किंवा बंगल्यातून जागा भाड्याने घेऊन आधीपासून करीत असतील अशांनी
१८ जुलै २०२२ पासून आपण होऊन १८% कर सरकार जमा करायचा आहे. इतकेच नाही तर असा एखादा
एकल व्यावसायिक (प्रोप्रायटर) स्वत:च्या राहण्यासाठी जरी जागा भाड्याने घेऊन राहात
असेल तरीही त्यावर कर आकारणी होणार आहे.
काही मोठ्या कंपन्या विविध कारणांसाठी सदनिका, निवासी इमारती
किंवा बंगले देखील भाड्याने घेत असतात. याचे विविध उपयोग होत असतात. एखाद्या इमारतीत
आपापले कर्मचारी यांची निवासाची व्यवस्था केली जाते. काहीवेळा क्लब हाऊस किंवा कर्मचारी करमणूक केंद्र म्हणूनही यांचा उपयोग
केला जातो तर काही बंगले हे त्या कंपनीचे विश्रामधाम म्हणूनही वापरण्यात येते. हे तपशीलात
सांगण्याचे कारण असे की या वापराचा संबंधे पुढे येतो.
भरलेल्या कराचा परतावा (क्रेडिट ) मिळत असल्याने व्यावसायिकांना
त्रास नाही किंवा सरकारलाही लाभ नाही असे सांगितले जाते. मात्र वस्तुस्थिती काहीशी
वेगळी आहे. कर परतावा मिळताना काही नियमांचा विचार करावा लागतो. समजा अशी भाड्याची
जागा कर्मचारी यांच्यानिवासासाठी होणार असेल (म्हणजे बँकेच्या मॅनेजरसाठी घेतलेला फ्लॅट)
किंवा आधी म्हटल्याप्रमाणे करमणूक केंद्र म्हणून त्याचा वापर होत असेल तर कलम १७(५)
मधे प्रतिबंदित करपरताच्याविषयी तपशीलात माहिती दिली आहे. त्या नुसार कर्मचारी यांच्या
व्यक्तिगत वापरासाठी दिलेली वस्तू किंवा सेवा
यांवरील कर्परतावा मिळत नाही. तसेच कर्मचारी कल्याण संदर्भात देऊकेलेल्या सुविधा (जसे
करमणूक केंद्र) यासाठी जागा भाड्याने घेतली असल्यास त्यावरील कराचा परतावा मिळणार नाही.
हे लक्षात घेऊन जे कोणी निवासी जागा भाड्याने घेऊन व्यवसाय
किंवा व्यवसाय संबंधी त्याचा वापर करीत असतील अशांनी (घरमालकाने न लावल्यास) आपण होऊन
कर भरायचा असून शक्य असेल तरच त्याचा परतावा घ्यायचा आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
या नंतर केंद्र सरकारच्या अर्थखात्याकडून या संबंधी एक खुलासा करण्यात आला आहे त्या नुसार निवासी कारणासठी जागा भाड्याने घेतली असल्यास त्यावर कर आकारला जाणार नाही. मात्र हा खुलासा केवळ ट्वीटर माध्यमातून आला असूअ त्याला काहीही कायदीशीर बैठक नाही असे म्हणावेसे वाटते
चारुचंद्र भिडे
ॲड्व्होकेट
Comments
Post a Comment