Posts

Showing posts from August, 2022

जी एस् टी मधील बदलाबाबत संभ्रम 15.08.2022 लोकसत्ता

जी एस्‌ टी मधील   बदलाबाबत संभ्रम   ॲड् चारुचंद्र भिडे   जी एस्‌ टी परिषदेची बैठक सुमारे दर दोन महिन्यांनी होते. पैकी ४७ वी बैठक जून अखेरीस झाली. या बैठकीला या कायद्याला ५ वर्षे पूर्ण होत होती ही पार्श्वभूमि होते व या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, सरकारला तशा सूचनाही केल्या आणि सरकारने त्या मान्य करून कायद्यातील कराच्या दरात, सवलतींमधे आणि काही कार्यपद्धतींमधे बदल केले. पैकी कार्यपद्धतीचे बदल वगळता बाकी सर्व बदलांसबंधी अधिसूसना (नोटिफिकेशनस्‌) प्रकाशित करून त्या सर्वांची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. सामान्य ग्राहकाच्या नजरेतून एकच गोष्ट घडली ती अशी की अनेक वस्तू महाग झाल्या. कोणत्या वस्तू किंवा सेवा महग झाल्या   या संबंधी समाजात, व्यापारात बराच गोंधळ आहे हे समोर येत आहे.   काहीजण अनवधानाने, काही अज्ञानाने आणि काही अति आत्मविश्वासाने हे संभ्रम निर्माण करीत असून काही वृत्तपत्रे व सोशल मीडिया म्हणजेच प्रमुख्याने व्हॉट्सॲप विद्यापीठ   यामधे खतपाणी घालीत आहेत. या बैठकीत अनेक बदल सुचवून पुढे ते अंमलात आले असले तरी जनसामान्य आणि छोटे व्यावसायिक यांच्या पुरते पाहायचे तर डबा