GST Bhide Consultants
15.08/2022 सप्रेम नमस्कार विनंती विशेष महाराष्ट्र टाएम्स रोमवार ८ ऑगस्ट २०२२ ला हा लेख प्रकाशित झालेला आहे तो आपणासाठी पाठवीत आहे.- जी एस् टी मधील निवासी जागा भाड्याने देण्यासंबंधी वस्तु सेवा करा या विषयात नुकतेच काही बदल झाले असून ते १८ जुलै २०२२ पासून लागू झाले आहेत त्यापैकी एक महत्त्वाचा बदल असा की निवासी जागा व्यावसायिकास भाड्याने दिली तर त्यावर कर लागणार आहे. या संबंधी थोडी पार्श्वभूमी जाणणे महत्त्वाचे आहे. जागा भाड्याने देणे ही पूर्वापार करपात्र सेवा मानली गेली असून जी एस् टी आल्यादिवसापासूनच ती करपात्र आहे. या संबंधी अधिसूचना १२/२०१७मधे असा खुलासा करण्यात आला आहे की सदर जागा निवासी कारणासाठी भाड्याने दिल्यास त्यावर कर आकारणी होणार नाही किंवा त्यावर करमफी आहे. या चा अर्थ असा की सामान्य माणसांना निवासासाठी जागा भाड्याने घेतली तर त्यावर सरकार कर आकारणार नाही. १८ जुलै २०२२ पासूनही यात काहीच बदल करण्यात आला नाही. पूर्वापार अनेक व्यावसायिक आपापला व्यवसाय निवासी जागेतून करीत आले आहेत, अनेक चार्टर्ड अकाउंटंट्स, सल्लागार व अन्य व्यावसायिक घरे, सदनिका यांचा वापर आपले कार्यालय, दुकान